35 उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार परभणी महानगरपालिका निवडणूक

आज उमेदवारी अर्ज माघारीची अंतीम मुदत

        परभणी(प्रतिनिधी) परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व छाननी प्रक्रियेतून वैध ठरलेल्या 35 उमेदवारांनी गुरुवार 1 जानेवारी रोजी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
        प्रभाग क्रमांक 1 अ मधून अशोक प्रकाशलाल जयस्वाल, यमुनाबाई लक्ष्मणराव डहाळे, ब मधून ऋतुजा निलेश पतंगे, ड मधून शेख सलीम शेख इब्राहीम, शेख म. शफीक हबीब, प्रभाग क्रमांक 2 अ मधून शेख उबोद शेख हमीद, ब मधून खुरेशी अहेमद रफीक अहेमद गफार, क मधून हाजरा बेगम सय्यद साजेद अली यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. प्रभाग क्रमांक 3 क मधील सर्वसाधारण महिला गटातील नुजहत खानम फेरोज खान, खान पठाण समरीन खान व आरती व्यंकटराव शिंदे या तीघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक 4 अ मधून अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून प्रभावती लक्ष्मणराव अन्नपूर्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
         प्रभाग क्रमांक 6 अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून पुरभाजी वामन साळवे, मुकेश गणेश गाडे, प्रभाग 6 ब मधून नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून रजमीन बानू मोहम्मद सलीम तर प्रभाग क्रमांक 7 ब मधून संगीता लक्ष्मणराव मुळे, क मधून शेख उबेद शेख हमीद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग 8 अ मधून लतीफा बी हसीबुर रहेमान, शकीला बेगम अहेमद मजीद, क मधून मोहम्मद अब्दुल मुजीब अन्सारी, शेख शब्बीर शेख मोहम्मद, ड मधून अब्दुल नदीम अब्दुल खुद्दुस अन्सारी, प्रभाग क्रमांक 9 ड मधून कामरान खान सरदार खान, संतोषी सुनील देवकर, प्रभाग क्रमांक 10 अ मधून अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणार्‍या या जागेतून श्‍वेता भगवानराव जगताप, प्रभाग 11 अ मूधन नागरीकांचा मागास प्रवर्ग राखीव गटातून फातीम अब्दुल जावीद, तर 11 ब मधून सर्वसाधारण महिलांसाठी राखीव गटातून शाहीना बानो खमीसा मोहम्मद साजीद, प्रभाग 11 ड मधून सर्वसाधारणसाठी राखीव प्रवर्गातून मोईज खान नुरुल्ला खान, शेख शफी शेख गनी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
        प्रभाग 13 अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव गटातून अमोल तात्यासाहेब पाथरीकर, प्रभाग 13 क मधून सर्वसाधारण महिलांसाठी राखीव प्रवर्गातून ताज खान फिरदोस बेगम, प्रभाग 13 ड मधून सर्वसाधारण प्रवर्ग राखीव गटातून स. मुजम्मील स. यासीन, प्रभाग 14 क मधून लक्ष्मीबाई नारायण कांबळे, ड मधून शेख रफी अहेमद, प्रभाग क्रमांक 15 ई मधून अनिल मुदगलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!