परभणी (प्रतिनिधी)
जिंतूर येथे पठाण मोहल्ला येथे जफरखा पठाण याच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास पावणेतीन लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
कारवाई वेळी यातील आरोपी जफर खा पठाण हा घराच्या छतावरून पळून गेला. त्याच्या घरी 2 लाख 72 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला. दोन शासकीय पंचासमक्ष जप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही जिंतूर पोलीस करत आहेत.
