मंगळवारी होणार परभणी महापालिकेची आरक्षण सोडत

परभणी/प्रतिनिधी
येत्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी परभणी महानगरपालिका सदस्यांचे मंगळवारी (दि.11) आरक्षण सोडत कार्यक्रम सकाळी 10 वाजता बी.रघुनाथ सभागृह वसमत रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

महापालिका निवडणुकीतील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करून सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि.17) आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारूपावर नागरीकांनी हरकती आणि सुचना मंगळवार (दि.24) दुपारी 3 वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयातील निवडणुक विभागात सादर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी केले आहे.

                                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!