-परभणी पोलिसांची कारवाई
परभणी (प्रतिनिधी)
शहरातील एका गुन्हेगाराविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने हद्दपारी आदेश जारी केल्याने परभणी पोलिसांनी गुन्हेगार तुरुंगातून सुटताच शनिवार 8 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातून हद्दपार केले.
शेख सुलेमान उर्फ बादल शेख सिद्दिकी(वय 24)रा. कादराबाद प्लॉट, परभणी असे हद्दपार कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शेख सुलेमान उर्फ बादल शेख सिद्दिकी याच्याविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत पोहोचविणे, जबरी चोरी, लोकसेवकांवर हल्ला आदींसहित विविध 10 गुन्हे दाखल असल्याने पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या आदेशान्वये नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कदम आणि सहायक पोलिस निरीक्षक कारवार यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला. उपविभागीय दंडाधिकारी उदयसिंह भोसले यांनी मागील 19 सप्टेंबर रोजी गुन्हेगारास पुढील एक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत आदेश पारित केला. गुन्हेगार शेख सुलेमान उर्फ बादल शख सिद्दिकी हा परभणी कारागृहातून शनिवारी(दि. 8)जामिनावर बाहेर पडताच त्याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाप्रमाणे परभणी पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक कारवार, पोलिस उपनिरीक्षक बिक्कड, पोलिस हवालदार सोडगीर, इरशाद अली, पोलिस नाईक, चव्हाण, पोले आणि पोलीस अंमलदार मुरकुटे यांनी केली.
