मानवत(प्रतिनिधी)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मानवत येथील डॉ. अंकुश लाड व समर्थकांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी(दि. ८) परभणी येथे आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. याच कार्यक्रमात पक्षाने मानवत नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली.
पक्षप्रवेश केलेल्यात शहरातील प्रकाश पोरवाल, गिरीश कत्रुवार, बाळासाहेब मोरे, सुरेश काबरा, गणेश कुमावत, मोहन लाड, संजय बांगड, डॉ. राजेश्वर दहे, अँड. किरण बारहाते, राजू खरात, राजेश वासुंबे, कविता धबडगे, अभिषेक अळसपुरे, किशोर लाड, दत्ता चौधरी, विनोद राहाटे, बाजीराव हळनोर, नियामत खान, अ. रहीम अ. करीम, सय्यद जमील, स्वप्निल शिंदे, गणेश उगले आदींचा समावेश आहे. या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून राणी अंकुश लाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
