आमदार राजेश विटेकर व सईद खान गटास मोठा धक्का

नखातेंविरुध्दचा अविश्‍वास ठराव 5 विरुध्द 13 मतांनी मंजूर
पाथरी(प्रतिनिधी)पाथरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल नखाते यांच्याविरुध्दचा अविश्‍वास ठराव आज 5 विरुध्द 13 मतांनी मंजूर करण्यात आला.
शिवसेनेच्या संचालकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्याशी हात मिळावणी केल्यानंतर बाजार समितीचे सभापती नखाते यांच्या विरोधात अविशवास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नखाते यांना मोठा धक्का बसला. अपेक्षेप्रमाणे तो ठराव 5 विरुध्द 13 मतांनी मंजूर झाला. त्यामुळे सभापती नखाते यांना सभापती पदावरुन पायउतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले.
दरम्यान, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते सईद खान आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्याकरीता हा मोठा झटका मानला जात आहे.

सर्व आरोप चुकीचे, सहानभूती मिळणार -अनिलराव नखाते
विरोधातील संचालकांनी विश्वासात घेत नसल्याचा जो बिनबुडाचा आरोप केला आहे, त्यात तथ्य नाही. आपल्याविरुध्दचा आजचा अविश्‍वास ठराव पारित झाल्याने आपणास सभापती पद सोडावे लागले तरीही लोकांची सहानभूती माझ्यासोबत आहे. निश्‍चितच याचा परिणाम आगामी सर्व निवडणुकीमध्ये दिसून येईल, अशी प्रतिक्रिया नखाते यांनी व्यक्त केली.

आम्ही सर्व संचालक आजही शिवसेनेतच-पप्पू घाडगे
राजकीय घडामोडी मध्ये जरी आम्ही काँग्रेस सोबत गेलो असलो तरीही आमची विचारधारा शिवसेनेचीच आहे. आम्ही सर्व संचालक आजही शिवसेनेतच आहोत, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक पप्पू घाडगे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!