Post Views: 166
परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यातील सातसह नगरपालिकेंतर्गत नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून, शुक्रवार 14 नोव्हेंबर सायंकाळपर्यंत एकूण 2 नगराध्यक्षपदासाठी आणि 74 सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ही नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली.
पाथरी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी 1 आणि सदस्यपदासाठी 19, गंगाखेड येथे सदस्यपदासाठी 14, जिंतूरमध्ये 13, सेलू येथे 2, मानवत येथे 8, पूर्णा येथे 4 तर सोनपेठ येथे नगराध्यक्षपदासाठी 1 आणि सदस्यपदासाठी 14 अशी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. यामुळे जिल्ह्यातील सात नगरपरिषदांमधून एकूण 2 नगराध्यक्षपदांसाठी आणि 74 सदस्यपदांसाठी विविध पक्ष, संघटना तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज जमा केले आहेत.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात चांगलीच रंगत असून, विविध पक्षांकडून उमेदवार निश्चितीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी उमेदवारांची नावे अद्याप घोषित न झाल्याने संभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशनपत्रे दाखल होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.