फरार झालेला आरोपी ताब्यात

सेलू (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आरोपी फरार झाला होता. सदर आरोपीस शनिवारी दि.20/12/2025 रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.
सेलू पोलीस ठाण्यात गुरनं 622/25 मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 262 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार हा पोलिसांच्या तावडीत फरार झाला होता. सेलूतील राजीव गांधी नगर येथे राहणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर पवार यास नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या चौकशी दरम्यान त्याने दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुरनं 637/2025 मधील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक परभणी श्री रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुंजाळ यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, गणेश कौटकर, किशोर चव्हाण, उत्तम हनवते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!