शिवसेना उबाठा गटाद्वारे उद्या इच्छुकांच्या मुलाखती व मोर्चेबांधणीबाबत महत्वपूर्ण बैठक

  परभणी(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाद्वारे रविवार 21 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती, तसेच निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठकसुध्दा होणार आहे.
     शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे हे रविवारी सकाळी या निमित्ताने परभणीत दाखल होणार आहेत. ते दुपारी प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आढावा बैठकसुध्दा घेणार आहेत. दरम्यान, संबंधित इच्छुकांनी आपले उमेदवारी मागणीचे अर्ज सोमवार पर्यंत पक्ष कार्यालयात आणून द्यावेत, अर्जासाठी उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, शहरप्रमुख ज्ञानेश्‍वर पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!