जिंतूर(प्रतिनिधी)शेतातील एका घरामध्ये दरवाजा तोडून प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम, कागदपत्रे आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरल्याच्या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांनी मंगळवार चार नंबर रोजी ताब्यात घेतले.फिर्यादी आणि त्याची मुले 24 ऑगस्टला रात्री त्यांच्या शेतातील राहत्या घरी झोपले असता घरामागील दरवाजा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम 5 हजार रूपये, कागदपत्रे आणि ओपो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करून गुप्त माहितीच्या आधारे राम आत्माराम घोगरे (वय 21), योगेश शेकुराव गायकवाड (वय 18) दोघे रा.खोलगाडगा ता.जिंतूर या दोघांना अटक करून गुन्हयातील मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरिक्षक पुंड, पोलिस हवालदार सुनिल राठोड, सायबर सेलचे गणेश कौटकर आणि पोलिस अंमलदार धोत्रे यांनी मिळून केली.
