रेल्वे प्रवाशी महिलेच्या गळयातील गंठण लंपास मानवत रोड येथील घटना


परभणी(प्रतिनिधी)
रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोरटयाने महिला रेल्वे प्रवाशी असलेल्या आसनावर खिडकीतून हात घालून महिलेच्या गळयातील सोन्याचे गंठण लंपास केल्याची घटना मानवतरोड रेल्वेस्थानकादरम्यान रविवार 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकरणी सोमवारी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रध्दा कापसे या महिला रेल्वे प्रवाशी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या आई आणि मुलांसह रेल्वेने परभणी ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत होत्या. मानवत रोड येथे रेल्वे आल्यानंतर फिर्यादी फोनवर नातेवाईकांशी बोलत असतांना मानवत रोड येथून रेल्वे सुटली. याच दरम्यान चोरट्याने खिडकीतून हात घालत महिलेच्या गळयातील 25 ग्राम वजनाचे अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!