परभणी ( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच नगर परिषद, महानगरपालिका सदस्य यांच्या सोबत संवाद करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्क मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत उद्या परभणीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी केले आहे शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल रामायणा, ( हॉटेल वाटिका समोर, ) वसमत रोड परभणी येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत संपर्क मंत्री नरहरी झिरवळ हे संवाद साधणार आहेत. यावेळी माजी आमदार विजय भांबळे , युवा नेते सुरेश नागरे हे उपस्थित राहणार आहेत परभणी जिल्ह्यातील सर्व आजी/ माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी/ माजी पंचायत समिती सदस्य, आजी/ माजी नगर सेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे सभापती, नगराध्यक्ष, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तसेच जिल्हा व तालुका स्तरीय प्रमुख पदाधिकारी , सरपंच, सोसायटी चेअरमन अशा प्रमुखांना या बैठकीस आमंत्रित केले आहे. या आमंत्रित संवाद बैठकीस वरील सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ राजेश विटेकर व शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी केले आहे यांनी केले आहे
