कायद्याचा आधार देत अनेकांना दिला न्यायाचा दिलासा

वसमत : (प्रतिनिधी) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNS) अंतर्गत व ॲट्रॉसिटी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यात ॲड. फैसल आलम यांचे कार्य प्रशंसनीय ठरले आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी अनेक आरोपींना जामीन मिळवून दिला असून, त्यांच्या तर्कशुद्ध मार्गदर्शनामुळे जनतेत विश्वास वाढला आहे.

नुकत्याच ॲड. फैसल आलम यांनी गरीब कुटुंबातील तरुणांना जमीन मिळवून देऊन त्यांना नवा आयुष्याचा मार्ग दाखवला. स्थानिक नागरिक आणि सामाजिक मंडळी यांनी त्यांच्या या योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, “कायद्याचा योग्य वापर करून गरजू लोकांना मदत करणे हेच खरी सेवा आहे. फैसल आलम यांनी हे दाखवून दिले.”

त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक समाजात न्यायप्रक्रियेवर विश्वास वाढला असून, अनेक नागरिकांमध्ये कायद्याची गरज आणि महत्त्व अधोरेखित झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता राखून दिलासा मिळवून देण्याच्या त्यांच्या कामामुळे समाजात प्रेरणा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!