हिंगोली प्रतिनिधी (शिवाजी कऱ्हाळे)
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे अत्यंत दुर्दैवी घटना दिनांक सहा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक राजकीय पुढारी शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा देऊ असे आश्वासन देतात पन हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे परिसरामध्ये 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने व्यवसायाने शेतकरी असलेला बळीराम कऱ्हाळे वय अंदाजे 33 हा त्यांच्या शेता मध्ये विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेला असता वाटेतच एका शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून आपल्या पिकाचे
नुकसान होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने कुंपण करून त्यात मध्ये विद्युत प्रवाह सोडला असता एका युवा शेतकऱ्यांचा यामध्ये अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. मृत शेतकरी बळीराम कऱ्हाळे यांचे वय 33 असून त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एका वर्षाचा मुलगा आहे असे समजते.
विधानसभा लोकसभा निवडणूक प्रत्येक पक्षांनी शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा करू असे आश्वासन विधानसभा लोकसभा निवडणुकीतदेऊन सुद्धा विद्युत पुरवठा काही दिवसा काही रात्री असं का, यामुळे या तरुण युवा शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जर विद्युत पुरवठा 24 तासात सुरू असता तर तरुण युवा शेतकऱ्यांचा करून अंत झाला नसता .अशी चर्चा कष्टकरी शेतकरी वर्गातून बोलली जात आहे.
ज्यांनी चोवीस तास विद्युत पुरवठा करू असे आश्वासन दिले असेल तर त्यांनी 24 तास विद्युत पुरवठा का केला नाही. जर 24 तास विद्युत पुरवठा केला असता तर या शेतकऱ्यांना रात्री शेतात जायची पाळी येत नव्हती. 24 तास विद्युत पुरवठा न केल्याने या तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेला सत्ताधारी पक्ष जबाबदारआहे. असे सर्वत्र बोलले जात आहे. सत्ताधारी येथील सांत्वन करतील पण छोट्या छोट्या लेकरांना बाप आईला मुलगा ,पत्नीला पती शासनाच्या चुकीच्या धोरणा मुळे मृत्यू मुखी पडला .डिग्रस कऱ्हाळे शेत शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे.यासाठी घनदाट माळरावनावरील सर्व वृक्ष तोडल्याने सर्व वन्य प्राणी इतरत्र शेतात येत आहेत.त्यामुळे शेतकरी आपापल्या शेतामध्ये विद्युत प्रवाह टाकून झटका मशीन लावत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाने जर वृक्षतोड केली नसती तर वन्यप्राणी गावालगतच्या शेतात आले नसते आणि शेतकऱ्यांनीही झटका मशीन लावली नसती. आज झालेला हा प्रकार पूर्णतः सौर ऊर्जा प्रकल्पाने वृक्षतोड केल्यामुळे झाला आहे असे शेतकरी बोलत आहेत.
