जिंतूरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये हकीम लाला यांच्या पत्नी समरीन बेगम हकीम लाला यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार

जिंतूर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक हकीम झाला यांच्या पत्नी समरीन बेगम यांनी आपला उमेदवारी अर्ज 15 नोव्हेंबर रोजी दाखल केला आहे. येत्या सोमवारी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह सर्व उमेदवारासोबत ते आपला दुसरा अर्ज दाखल करणार आहेत
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दादाबुधवंत, पृथ्वीराज भांबळे, नियाज लाल उर्फ न्याजु लाला, बुखारी मस्जिद के अध्यक्ष सय्यद मुख्तार भाई, मंजूर खान, फेरोज लाला, महेफुज खान, नूर खान प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हकीमलाला यांनी मागील अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. तसेच विविध विकास कार्य करण्यासाठी प्रयत्न केले व समाजकार्याच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा समर्थन त्यांना मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!