पाथरी नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्षापदासाठीआसेफ खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल


पाथरी ( प्रतिनिधी) पाथरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आसिफ खान यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना असेफ खान यांनी सांगितले की,
माझे वडील बिरबल खान साहेब यांनी मला दिलेले आपुलकीचे संस्कार यामधून त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात अनेक समाजहित योजना आखून लाडक्या बहिणींना व युवकांना रोजगार मिळवून दिला.
त्यांच्याच आशिर्वादाने पाथरीत मी अनेक वर्ष विकासहिन पाथरीला विकासाच्या प्रवाहात आणले आहे. अनेक कोटी रुपये मंजूर केले, युवकांसाठी नोकरी महोत्सव घेउन नोकरी मिळवून दिली. या अनेक समाजपयोगी कामामुळे पाथरीकर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, नगराध्यक्ष व नगरसेवकांना मतदान रुपी आशिर्वाद देऊन काम करण्याची संधी देतील ही खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पक्ष निरिक्षक आनंद जाधव, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!