तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू
जिंतुर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील घटना
चारठाणा(प्रतिनीधी)
जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील शेतात कापूस वेचण्यास गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा रविवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पायल रोहिदास राठोड(वय 19)असे मयत युवतीचे नाव आहे. पायल राठोड ही सकाळी आपल्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. मात्र विहिरीत पडली घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासांती पोलिसांनी हा आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास बामणी पोलिस करीत आहे. दरम्यान विहिरीत पडलेल्या तरुणीला बाहेर काढण्यासाठी जिंतूर नगरपरिषदचे अग्निशमन दलाच्या पथक दाखल झाले. पथक प्रमुख सी. पी. राठोड, फायरमन बी. एस. रोकडे, एस. आर. भवाळे, एन. एम. राठोड तसेच वाहनचालक रवि पवार यांनी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करून युवतीस विहीरीच्या बाहेर काढले. दरम्यान तरुणीला जिंतुर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेमुळे पिंपळगाव तांडा परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास बामणी पोलिस करत असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.
