परभणी(प्रतिनिधी)
परभणी महानगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार 23 डिसेंबर रोजी पासून सुरू झाली आहे.नामनिर्देशनपत्र विक्रीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत ५५० नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीसाठी महापालिका स्तरावर एकूण पाच निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, सह जिल्हा निबंधक रतनसिंह साळोक आणि उपजिल्हाधिकारी विद्या मुंडे आदींचा समावेश आहे.
