पाच लाखाचा मुद्देमाल जप्त
परभणी(प्रतिनिधी)
पाथरी शहरात झालेल्या अनेक घरपोडी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हा शाखेस पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेने चौकशी केली असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाथरी शहरातील सागर कॉलनी येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकास चौकशी कामी त्याच्या पालकाच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आले असता या विधीसंघर्षग्रस्त बालकाने शहरातील ओमकारनगर, गौतमनगर आणि विठ्ठलनगर येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
यावेळी विधीसंघर्षबालकांकडून रोख रक्कम 1 लाख 63 हजार आणि अंदाजे 5 लाख 6 हजार 750 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 6 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस कारवाई करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, विलास सातपुते, पांडुरंग तुपसुंदर, माणिक डुकरे, मुकेश बुधवंत, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, उत्तम हनवते, इमरान खान आणि गजानन क्षीरसागर यांच्या पथकाने मिळून केली.
